राष्ट्रहितासाठी "सुवर्णकन्या फाऊंडेशन" संस्थेचा वचननामा, मनोगत व प्रस्तावना ...
सन्माननीय बंधु / भगिनी
आपल्या देशात नव्वद टक्के कुटुंबांना आपल्या वंशाचा वारसा चालविणेसाठी फक्त आणि फक्त "मुलगाच" पाहिजे याच हट्टामुळे गर्भातच "भ्रुणहत्या" करुन मुलींचा गर्भातच "खून " केला जात आहे, भ्रुणहत्येविषयी जरी कायदा कडक गेला असला तरी लपून - छपून हे प्रयोग होतच असतात . याचा परिणाम म्हणून साधारणतः शंभर मुलांमागे किमान दहा मुली कमी आहेत . परिणामी प्रत्येक शंभर मुलांमधील "दहा" मुले अविवाहित आहेत राज्याच्या व देशाच्या पातळीवर हा आकडा लाखो करोडोंवर जात असून या अविवाहित मुलांचे शारीरिक व मानसिक संतुलन ढासळत असून याचा परिणाम मुलींवरील वाढत्या "अत्याचारांवर " होत आहे त्यामुळे मुलगी गर्भाशयातसुध्दा सुरक्षित नाही व गर्भाच्या बाहेर देखील सुरक्षित नाही यामध्ये देशाची पन्नास टक्के ऊर्जा मुले व मुली यामधील संख्येचे संतुलन बरोबर आणण्यासाठी खर्च होत आहे .
मुलींवरील वाढते अत्याचार व अनाथ मुले तसेच आदिवासी मुले यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी वरीलप्रमाणे सर्वच बाबींचा विचार करुन भारत देशाच्या महान कार्यामध्ये " खारीचा" वाटा उचलण्यासाठी आम्हीं मंगळवार दि. २८/५/२०१९ रोजी श्री गणेश कृपेने मु.पो. खामगाव बु!! ता दौण्ड जि.पुणे पिन -४१२२१४ येथे " सुवर्णकन्या फाऊंडेशन " नावाने संस्था स्थापन केली आहे .
संस्थेचा मुळ उद्देश " मुलगी वाचवा , मुलगी जगवा , मुलगी शिकवा " हे अभियान राबवून ते प्रत्यक्षात आणणे हा आहे त्याचप्रमाणे आदिवासी , विधवा , निराधार , परितक्त्या महिलांसाठी "आश्रम "तयार करुन त्यामध्ये त्यांना लघुउद्योग निर्माण करुन त्यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवून समाजामध्ये त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे .
त्याचबरोबर आदिवासी , व निराधार मुलांसाठी "अनाथाश्रम" तयार करुन त्यांचे पालन ,पोषण , संगोपन , शिक्षण करणे हा असून नैसर्गिक आपत्ती सापडलेल्या कुटुंबातीचे कायमस्वरुपी पुर्नरवसन करणे व मदत करणे आहे .
तरी देशातील प्रत्येक कुटुंबांना "सुवर्णकन्या फाऊंडेशन " या संस्थेच्या वतीने आवाहन आहे देशाच्या कार्यात आपलाही "खारीचा" वाटा असूद्या मुलगी असो वा मुलगा "गर्भपात" करु नका .
जय हिंद , जय महाराष्ट्र , जय भारत !!
मुलगी वाचवा , मुलगी जगवा , मुलगी शिकवा !!
श्री विलास यशोदा हरिभाऊ नागवडे -
संस्थापक / अध्यक्ष सुवर्णकन्या फाऊंडेशन
( महाराष्ट्र राज्य )
"सुवर्णकन्या फाऊंडेशनला" मदत करा ..!
कशी मदत करू शकाल ?

Give Donation

(देणगी द्या)

Become A Volunteer

(स्वयंसेवक व्हा)

Adopt A Child

(मुलांना दत्तक घ्या)

Help For Education

(शिक्षणासाठी मदत)

Donate Land

(जमिनदान करावी)