उद्दीष्टे

संस्थेची ठळक उद्दिष्ट्ये ...

1. अनाथ, निराधार मुला मुलींनसाठी अनाथश्रम सुरू करणे. त्यात त्यांचे संगोपन,पालन पोषण, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत, आवश्यक वस्तु इ. सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. मतिमंद मुलांची शाळा सुरू करणे.

2. गरीब होतकरू, हुशार मुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप करणे उदा. वह्या , पुस्तके , कपडे, शैक्षणिक साहित्य इ. तसेच हुशार विध्यार्थांना शिष्यवृत्ती देणे . तसेच अत्यंत गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास विध्यार्थांना दत्तक घेऊन वार्षिक शालेय खर्च करणे. मुलगी वाचवा, मुलगी जगवा, मुलगी शिकवा हे अभियान राबिवणे.

3. मुला मुलींसाठी वस्तीग्रह सुरू करणे तसेच वयोवृद्ध, अपंग असलेल्या व्यक्तींसाठी सर्वोतोपरी मदत व सहकार्य करणे.

4. ग्रामीण, शहरी, दुर्गम, डोंगराळ, व आदिवासी भागातील गावात/पाड्यात सामाजिक,शैक्षणिक व सामाजिक विकासाचे विविध प्रकल्प / योजना कामी मार्गदर्शन व मदत करणे. शेती विषयक संशोधन प्रकल्प हाती घेणे. तसेच ग्रामीण भागात ऊर्जानिर्मिती व बायोगॅस व त्यावरील व्यवसाय निर्मिती करून देण्याबात सखोल मार्गदर्शन, सहाय्य व मदत करणे.

5. दुष्काळ, पुर, भूकंप, आग, युद्ध, वादळ, इ. आपत्तीत सापडलेल्या आपतग्रस्तांना सर्वोतोपरी मदत व सहकार्य करणे. तसेच मानवनिर्मित संकटात सापडलेल्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करणे. त्यासाठी मार्गदर्शन करणे आपत्ती व्यवस्थापन विषयक कामे करणे.

6. लहान मुलांसाठी बालसंगोपन, बालसदन व पाळणाघर सुरू करणे. आश्रमशाळा व अनाथाश्रम सुरू करणे. निराधार आश्रम स्थापन करणे व महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे कामी मार्गदर्शन करणे.

7. वृद्धासाठी वृद्धाश्रम सुरू करणे. वृद्धाश्रमात वृद्धांची अन्न, वस्त्र, निवारा, व औषधोपचार यांची सोय करणे व त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी प्रयत्न करणे.

8. इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा सुरू करणे. त्यामध्ये नर्सरी ( सिनीअर व ज्युनिअर केजी ) अंगणवाडी बालवाडी , पूर्वप्राथमिक, माध्यमिक , उच्चमाध्यमिक, महाविध्यालय, उच्च शिक्षण इ. व सर्व प्रकारचे शिक्षण की ज्याचा विध्यार्थांना त्यांच्या भावी आयुष्यात उपयोग होईल. असे मार्गदर्शनपर शिक्षण देणे. सर्व स्तरातील निवासी व अनिवासी विध्यार्थांनासाठी शैक्षणिक उपक्रम सुरू करणे.

9.फाऊंडेशन मार्फत समाजाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम पार पाडणे. समाजाचा सर्वांगीण विकास करणे. पर्यावरण व स्वच्छता याकडे विशेष लक्ष पुरवणे.

10. व्यावसायिक शिक्षण, संगणक शिक्षण, तांत्रिक शिक्षण , अध्यापक विध्यालाय, संगीत कला व क्रीडा प्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक शिक्षण, योगा प्रशिक्षण वर्ग, कमांडो प्रशिक्षण, सौर ऊर्जा शिक्षण, कृषि विद्यालय, कायद्याचे शिक्षण , आध्यात्मिक शिक्षण, पॉलीटेक्निक व आर्टिटेक शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण ,विविध व्यवसाय प्रशिक्षण, इंजींनीयरिंगच्या सर्व शाखेचे कोर्सेस D फार्मसी, B P Ed M डिग्री कोर्सेस, नर्सिंग कोर्सेस, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक कोर्सेस सौर ऊर्जा प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा कोर्सेस , एम पी एस सी व, यू पी एस सी संबंधी मार्गदर्शन इतर सर प्रकारचे शिक्षण विध्यार्थांना त्यांच्या भावी आयुष्यात उपयोग होईल असे मार्गदर्शनपर शिक्षण देण्यासाठी जरूर ते सर्वप्रकारचे प्रयत्न करणे तसेच वनीकरण, पर्यावरण व पर्यावरणासाठी असलेल्या इतर बाबीचे कार्य करणे .

11. विविध क्रीडाविषयक उपक्रम घेणे. विविध क्रीडा स्पर्धा आयोजीत करणे व पार पाडणे उदा. मल्लखांब , कब्बड्डी, खो खो, हॉली बॉल , फुट बॉल इ. तसेच आधुनिक साहित्य सामग्रीनेयुकत अशी अद्यावत व्यायामशाळा व जलतरण तलाव युवकांसाठी सुरू करणे क्रीडा विकासास चालना देणे

12. लोकांसाठी वाचनालय व ग्रंथालय सुरू करणे.

13. ग्रामीण शेतकरी बांधवसाठी शेतीतंत्र्याची अत्याधुनिक माहिती व नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती पुरवणे शेतीविषयक व्याख्याने आयोजित करणे. चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, शिबीर, मेळावे, प्रदर्शन इ. आयोजीत करणे. शेतीतज्ञांचे मार्गदर्शन शेतकर्‍यांना मिळवून देणे बी-बियाणे, खाते, जंतुनाशके, औषधे, अवजारे, मशागतीच्या पद्धती, पीक, संरक्षण, धाण्यसाठवण, इ. विषयी सखोल माहिती व ज्ञान उपलब्ध करून देणे.

14. फाऊंडेशन मार्फत विविध सामाजिक व जनहितउपयोगी कामे करतो. सुशिक्षित महिला व युवकांना रोजगार देणे कामी मार्गदर्शन करणे, तसेच समाजातील दुर्बल घटकांना कायदे विषयक ज्ञान उपलब्ध करून देणे. विविध योजना लोकांपर्यंत पोचवणे.

15. समाजातील गोरगरीब लोकांसाठी वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून सार्वजनिक हॉस्पिटलची निर्मिती करणे तसेच शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सुधारण्यासाठी वैद्यकीय शिबिरे घेणे. तज्ञ डॉक्टर बोलावून गरजू लोकांना मदत करणे. लबोरेटरीज सुरू करणर. रुग्ण लोकांना भेटी देणे.

16. फाऊंडेशन मार्फत परिसराचा सामाजिक विकास करणे. स्वच्छता अभियान कार्यक्रम सुरू करणे. परिसरात वृक्षारोपण करणे. पर्यावरण समतोल राखणे. पर्यावरणाविषयी जंजागृती करणे. वणीकरणाच्या माध्यमातून प्रदूषण मुक्त वातावरण तयार करणे.

17. स्थानिक परिसरातील जनता व पालकांच्या विविध समस्या शांततेच्या मार्गाने सोडविणे कामी मदत व मार्गदर्शन करणे.

18. विविध सामाजिक उपक्रम घेणे उदा. व्यसनमुक्ती, एड्स निर्मूलन, वृक्षारोपण, सामाजिक वनीकरण, स्त्री आधार, माता व बालसंगोपन, वृद्धाश्रम, साक्षरता अभियान, प्रौढ साक्षरत वर्ग, कुटुंबं नियोजन व आरोग्याशीबीर, रक्तदान व नेत्रदान शिबीर , मोफत चष्मे वाटप, ब्लड बँक, नारी समता मंच, आध्यात्मिक केंद्र, सामुदायिक विवाह सोहळा , युवांकासाठी स्वयंरोजगार योजनेसंबधी मार्गदर्शन, नवविवाहित दाम्पत्यांना मार्गदर्शन करणे. गर्भ संस्कार शिबीर व मार्गदर्शन इत्यादि.

19. ग्रामीण, शहरी, दुर्गम, डोंगराळ, व आदिवासी भागातील गावात/पाड्यात सामाजिक,शैक्षणिक व सामाजिक विकासाचे विविध प्रकल्प / योजना कामी मार्गदर्शन व मदत करणे. शेती विषयक संशोधन प्रकल्प हाती घेणे. तसेच ग्रामीण भागात ऊर्जानिर्मिती व बायोगॅस व त्यावरील व्यवसाय निर्मिती करून देण्याबात सखोल मार्गदर्शन, सहाय्य व मदत करणे.

20. आधुनिक शेती, शेतकरी प्रशिक्षण योजना सुरू करणे नोंदनीकृत शेती विषयक काम करणार्‍या सेवाभावी संस्थाना तांत्रिक मार्गदशन करणे. वृक्षलागवड, वृक्षासंवर्धन, जलसवर्धन, इ. उपक्रम हाती घेणे. शेतकर्‍यांसाठी व त्यांच्या हितासाठी उद्योग व्यवसाय व प्रशिक्षण शिबीर वेळोवेळी आयोजित करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे तसेच शेती व शेती पूरक मालाचे उत्पादन प्रक्रिया व विक्री संबधि शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे.

21. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यावसायची माहिती उपलब्ध करून देणे उदा. दुग्धव्यावसाय, मत्सशेती, वराहपालन, मधमाशीपाळन, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन इ. उपक्रमा बाबत माहिती देणे. गोशाळा पालन उपक्रम राबिवणे.

22. महिलांसाठी विविधा कल्याणकारी उपक्रम सुरू करणे त्यामध्ये भरतकाम, विणकाम, शिवणकाम, संगणक, हॉटेल मॅनेजमेंट, पाककला, उद्योग प्रशिक्षण, खादी पदार्थ निर्मिती, फॅशन डिजायनर, संस्कार वर्ग, ब्युटी पार्लरचे कोर्सेस, हेल्थ क्लब, मेहंदी, रांगोळी, चित्रकला, हस्तकला, सिरामिक, पेंटिंग इ. प्रशिक्षण वर्ग आयोजित करून महिलाना प्रशिक्षित करणे व विविध उपक्रमातून महिला सक्षम कार्यक्रम करणे तसेच महिलांमध्ये उद्योजकता वाढीस चालना देणे.

23. महिलांना स्वावलंबी बनण्याकरिता त्यांना घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण माहिती व मार्गदर्शन करणे तसेच बेरोजगार तरुणांना नोकरी विषयक किंवा व्यवसाय विषयक मार्गदर्शक करून त्यांना रोजगार उपलब्ध करण्याविषयी माहिती पुरवणे.

24. ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्यामध्ये सुप्त कलागुणांना चालना देऊन क्षमता विकास करणे. ग्रामीण विकास करणे. ग्रामीण विकास या विषयी संपूर्ण माहिती महिलांना प्रशिक्षणांच्या माध्यामातून पुरवणे.

25. फाऊंडेशन मार्फत कला. साहित्य, विषयक, विविध उपक्रम राबिवणे, नवोदित साहित्याचे संमेलन भरीवणे, नियतकालिके, मासिके, पुस्तके, वार्षिक दिवाळी अंक प्रकाशित करणे.

26. मुला मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन व प्रायोजन करणे. उदा. निबंध, वकृत्व, गायन, अंताक्षरी, मेहंदी, रांगोळी, नृत्य, चित्रकला, हस्तकला, काव्यवाचन इ. व मुलांना उत्तेजनार्थ बक्षिसे व स्मृतिचिन्हे देणे.

27. समाजातील मान्यवर, थोर, कर्तुत्वान, व क्रीडा, लेखन व सामाजिक क्षेत्रातील लोकांचे आदर्श विचार जनतेपर्यंत पोचीवणे. त्यासाठी व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, मेळावे, प्रवचन इ. आयोजित करणे.

28. महिलांसाठी घरगुती उद्योगांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे तसेच युवकांना नवनवीन उद्योगासंबंधी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे.

29. फाऊंडेशन मार्फत विविध सांस्कृतीक कार्येक्रम व पारंपारिक सण व उत्सव साजरे करणे तसेच राष्ट्रीय सण साजरे करणे उदा. सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव, शिवजयंती, दहिहांडी इत्यादी.

30. अनाथ, अपंग, वृद्ध, विधवा, निराधार, नैसर्गिक पीडित लोकांना सर्वतोपरी सहाय्य व मदत करणे. गोरगरिबांसाठी मोबाईल/फिरता दवाखाना सुरू करणे.

31. समाजातील गोरगरीब लोंकासाठी वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून सार्वजनिक इस्पितळाची निर्मिती करणे. हेल्थ सेंटर सुरू करणे.

32. फाऊंडेशन मार्फत टेक्निकल, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करणे त्यात विध्यार्थांना यांत्रिक, तांत्रिक, औद्योगिक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करणे. त्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेणे व त्यात विविध कोर्सेस उपलब्ध करून देणे उदा. व्होकेशनल टेक्निकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलेरिंग, भरतकाम, रेडियो, फॅन , टेलीफोन, मिक्सर, ग्राईंडर, मोबाईल दुरूस्ती, वाशिंग मशीन, टेपरेकोर्डर, फ्रीज, एयरकंडिशन दुरूस्ती, वाहन व इलेक्ट्रिक दुरूस्ती कोर्स, स्क्रीन प्रिंटिंग इन्स्टिट्युट व तसेच ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण देणे संगणक, प्रशिक्षण, फॅशन डीजायनिग, आर्ट व क्राफ्ट प्रशिक्षण इ.

33. जनतेत समाजसेवेची जाणीव निर्माण करणे.