1. अनाथ, निराधार मुला मुलींनसाठी अनाथश्रम सुरू करणे. त्यात त्यांचे संगोपन,पालन पोषण, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत, आवश्यक वस्तु इ. सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. मतिमंद मुलांची शाळा सुरू करणे.
2. गरीब होतकरू, हुशार मुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप करणे उदा. वह्या , पुस्तके , कपडे, शैक्षणिक साहित्य इ. तसेच हुशार विध्यार्थांना शिष्यवृत्ती देणे . तसेच अत्यंत गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास विध्यार्थांना दत्तक घेऊन वार्षिक शालेय खर्च करणे. मुलगी वाचवा, मुलगी जगवा, मुलगी शिकवा हे अभियान राबिवणे.